Karjat Ahmednagar news : सर्व सामाजिक संघटना आणि कर्जत नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदानाच्या वर्षपूर्ती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

0

सर्व सामाजिक संघटना आणि कर्जत नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदानाच्या वर्षपूर्ती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

सर्व सामाजिक संघटना आणि कर्जत नगरपंचायत  यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत शहर आणि परिसरात महात्मा गांधी जयंती दिनांक २ऑक्टोबर२०२० पासून कर्जत शहरामध्ये समविचारी संघटना एकत्र येऊन सकाळी साडेसहा ते साडेसात यादरम्यान श्रमदानाची मोहीम सुरू करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत शहर व परिसरामध्ये सुरुवातीला स्वच्छता मोहीम राबविण्यात आली त्यानंतर राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये वृक्षारोपणाची मोहीम हाती घेण्यात आली या मोहिमेअंतर्गत  सर्व सामाजिक संघटनांनी३६५दिवस श्रमदान मोहिम हाती घेतली होती.श्रमदानाच्या वर्षपूर्ती सोहळा म्हणून सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने शहरांमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये दि. 30 सप्टेंबर रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१ऑक्टोबर रोजी र सकाळी सहा तीस वाजता वृक्षारोपणाच्या महाश्रमदानाचे  आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र राज्य अटल पणन अभियानाचे मुख्य व्याख्याते गणेश शिंदे हे यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच दि.२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने शहरांमध्ये भव्य स्वच्छता अभियान राबवायचे असल्याने यामध्ये शहरातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरच्या परिसरात स्वच्छतेचे श्रमदान करून सर्वांनी माझी वसुंधरा कर्जत अहमदनगर या हॅशटॅगद्वारे फेसबुक लाईव्ह करावे असे आवाहन सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच वर्षपूर्ती निमित्त या अभियानाच्या सुरुवातीपासून आज अखेर या अभियानास आर्थिक, वस्तू स्वरूपात आणि विविध प्रकारे सहकार्य करणाऱ्यांना सन्मानपत्र देण्यात येणार आहे.या अभियानात मोठ्या संख्येने नागरीकांनी सहभागी होऊन कर्जत शहर हरित,स्वच्छ आणि सुंदर करण्यास हातभार लावावा असे आवाहन सर्व सामाजिक संघटना आणि कर्जत नगरपंचायत यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.