Karjat News : ऐश्र्वर्या शिंदे नायब तहसीलदार व सहाय्यक वनसंरक्षक परिक्षेत उताीर्ण

0

कर्जत : स्पर्धा परीक्षा च्या जगात अपयश येऊन पण न खचता जिद्दीने अतिशय चिकाटीने आपले काम,आपला अभ्यासामध्ये सातत्य ठेवले तर यश हे नक्कीच मिळते.असा विश्वास ऐश्वर्या बाळासाहेब शिंदे यांनी बोलून दाखवला. नव्हे खरा करून दाखवला आहे.
नुकत्याच झालेल्या स्पर्धा परिक्षेत ऐश्र्वर्या शिंदे हिने नायब तहसीलदार व सहाय्यक वनसंरक्षक क्लास १ च्या पोस्ट मिळाल्या आहेत.
माझ्या या यशामध्ये माझे आई वडील, भाऊ बहिण त्याचप्रमाणे मित्र – मैत्रिणी यांचा मोलाचा वाटा आहे. मी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले आहे पण इथे थांबणे नाही पुढील परीक्षा ची तयारी चालूच ठेवायची आहे आणि त्याचप्रमाणे प्राप्त झालेल्या पोस्ट च्या माध्यमातून नक्कीच सर्वसामान्य लोकांसाठी काम करायचे आहे. असा मनोदय ही शिंदे यांनी व्यक्त केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.