Ahmednagar : ग्राम रोजगार सेवकांना सेवेत सामावून घ्यावे मागणी

0

कर्जत : ग्रामरोजगार सेवकांना ग्रामपंचायत स्तरावर कायम करण्याचा निर्णय घेऊन राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांना ग्रामपंचायत सेवेत कायम करून न्याय मिळावा या मागणीसाठी ग्राम रोजगार सेवकांनी कर्जत तहसीलदार कार्यालया समोर एकदिवसीय लक्षणीय उपोषण केले .

२००६ पासुन आजतगायत राज्यात एकूण २८,१४४ रोजगार सेवक शासनाच्या प्रशासकीय खर्चाच्या निधीतून ६ % मानधनावर कार्यरत असून सन २००६ पासून गेल्या १५ ( पंधरा वर्षांपासून ग्रामपंचायत करून माध्यमातून नवीन ग्राम पंचायत सदस्य व सरपंच यांची निवड होते . पण राज्यामध्ये बऱ्याच ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर झाल्यावर सूडबुद्धीने ग्रामरोजगार सेवकांना कामावरून कमी जाणीवपूर्वक अन्याय केला जातो त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून त्यामुळे ग्रामरोजगार सेवकांना त्रास होऊन निर्णयाला सामोरे जावे लागते व त्यांच्या कुटुंबाची पालनपोषणाची जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून रोजगार सेवकांवर असल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते त्यामुळे सरकारने
दखल घेऊन ग्रामरोजगार सेवकांना ग्रामपंचायत स्तरावर कायम करण्याचा निर्णय घेऊन राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांना ग्रामपंचायत सेवेत कायम करून न्याय द्यावा अशी मागणी ग्राम रोजगार सेवकांनी तहसीलदार नानासाहेब आगळे व गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्या कडे
निवेदनाद्वारे केली.

यावेळी जिल्हा अध्यक्ष अनिल गंगावणे कर्जत तालुका ग्रामरोजगार सेवा संघटनेचे अध्यक्ष युवराज नवसरे उपाध्यक्ष प्रशांत आगवन यांच्या सह तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक मोठ्या संख्येने लक्षणीय एकदिवसीय उपोषणाला बसले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.