राष्ट्रीय छात्र सेनेचा व्यापक आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने नेमली उच्च स्तरीय तज्ञ समिती

0

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2021

प्रमुख वैशिष्ट्ये :

  • राष्ट्र उभारणीमध्ये एनसीसी अर्थात राष्ट्रीय  छात्र सेनेच्या  छात्रांना   अधिक प्रभावी योगदानासाठी सक्षम करण्याकरिता समिती उपाय सुचवणार
  • छात्र सेनेच्या अधिक हितासाठी, एनसीसीच्या माजी विद्यार्थ्यांकडून हातभार लावण्यासाठी, समिती मार्ग  सुचवणार
  • एनसीसीच्या अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या दृष्टीने  अशाच प्रकारच्या आंतरराष्ट्रीय युवा संस्थेतल्या उत्तम पद्धतींची शिफारस करणार
  • माजी खासदार बैजयंत पांडा या समितीचे अध्यक्ष तर क्रिकेटपटू एम एस धोनी, महिंद्र समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांचा सदस्यात समावेश

राष्ट्रीय छात्र सेनेचा व्यापक आढावा घेत बदलत्या काळानुरूप एनसीसी अधिक समर्पक करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने माजी खासदार बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय तज्ञ समिती स्थापन केली आहे.

राष्ट्र उभारणीमध्ये आणि विविध क्षेत्रात राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नात एनसीसी छात्रांना अधिक प्रभावी योगदानासाठी सक्षम करण्याकरिता, एनसीसीच्या माजी विद्यार्थ्यांकडून हातभार लावण्यासाठी तसेच  एनसीसीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या दृष्टीने  अशाच प्रकारच्या आंतरराष्ट्रीय युवा संस्थेतल्या उत्तम पद्धतींची शिफारस समिती करणार आहे.

MHT CET प्रवेशपत्र 2021 (MHT CET Admit Card 2021 ) महाराष्ट्र सीईटी पीसीएम ग्रुप प्रवेशपत्र जारी, थेट लिंक

फेसबुक अकाउंट कसे डिलीट करावे ?

महाराष्ट्र FYJC 2021 प्रथम गुणवत्ता यादी (11 Merit List 2021) अशी इथे चेक करा मेरिट लिस्ट !

समितीचे सदस्य याप्रमाणे आहेत-

Shri Baijayant Panda, former Member of Parliament Chairperson
Col. (Retd) Rajyavardhan Singh Rathore, Member of Parliament Member
Shri Vinay Sahasrabuddhe, Member of Parliament Member
Shri Anand Mahindra, Chairman, Mahindra Group Member
Shri Mahendra Singh Dhoni, Cricketer Member
Shri Sanjeev Sanyal, Principal Economic Advisor, Ministry of Finance Member
Prof. Najma Akhtar, Vice Chancellor, Jamia Millia Islamia Member
Prof. Vasudha Kamat, Former VC, SNDT Women’s University Member
Shri Mukul Kanitkar, National Organizing Secretary, Bhartiya Shikshan Mandal Member
Maj. Gen. Alok Raj (Retd) Member
Shri Milind Kamble, Chairman, DICCI Member
Shri Rituraj Sinha, MD, SIS India Limited Member
Ms. Vedika Bhandarkar, Chief Operating Officer, Water.org Member
Shri Anand Shah, CEO, Databook Member
Shri Mayank Tewari, JS (Trg), DoD Member Secretary

एनसीसी ही युवकांमध्ये शिस्त,धर्मनिरपेक्ष दृष्टीकोन, निःस्वार्थ सेवा बाणवत त्यांचे चरित्र घडवणारी गणवेशधारी मोठी संस्था आहे. समाजातल्या सर्व क्षेत्रात नेतृत्व करण्याचे गुण असलेले, संघटीत, प्रशिक्षित आणि ध्येय्याने प्रेरित युवक संघटीत करण्याचा याचा उद्देश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.